
ELIE WIESEL
Birth Date : 30/09/1928
Death Date : 02/07/2016
एली वायझेल यांचा जन्म १९२८ मध्ये रुमानियात झाला. अगदी लहान असतानाच त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला ऑशवित्झ इथे हद्दपार करण्यात आले. नंतर बुशेनवाल्डच्या तुरुंगात. तिथल्या छळामध्ये त्यांचे आई-वडील आणि लहान बहीण यांचा मृत्यू ओढवला. महायुद्ध संपल्यावर एली वायझेल पॅरिसला गेले. तिथे त्यांनी नाइट हे पुस्तक लिहिले. या पुस्तकामध्ये त्यांच्या हेलावून टाकणाऱ्या आठवणी आहेत. एली वायझेल हे बोस्टन विद्यापीठामध्ये ह्युमॅनिटीज या विषयाचे प्रोफेसर आहेत आणि यू. एस. होलोकॉस्ट मेमोरियल कौन्सलचे अध्यक्ष आहेत. अ बेगर इन जेरुसलेम आणि सोल्स ऑन फायर या दोन पुस्तकांनी त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून दिली. प्रत्येक सहृदय, संवेदनशील माणसाने अवश्य वाचावीत, अशी ही पुस्तके आहेत. कला आणि प्रतिभा यांचा उत्कृष्ट मिलाफ या पुस्तकांमध्ये आढळतो. डॉन, द अक्सिडेंट, द टाउन बियाँड द वॉल, लीजन्डस ऑफ अवर टाइम, द ओथ, द मॅडनेस ऑफ गॉड, अ ज्यू टुडे ही तसेच इतर आणखी काही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत. १९८६ मध्ये त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला. नोबेल पारितोषिक समितीने एली वायझेल यांच्याबद्दल म्हटलं आहे : ज्या वेळी वंशवाद, हिंसाचार, दडपशाही यांनी जगाचा ताबा घेतला होता, त्या वेळी मानवतेला आध्यााQत्मक शक्तीच्या बळावर मार्गदर्शन करणाNया नेत्यांपैकी ते एक आहेत. अमर्याद मानवताप्रेम हेच न्याय आणि शांततेसाठी चिरकाल टिकणारे मूल्य आहे याचा त्यांनी जगापुढे वारंवार उच्चार केला आहे.
-
NIGHT – नाइट
Product Highlightsदुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या नाझी भस्मासुराने लक्षावधी ज्यूंचा क्रूर नरमेध केला. त्या क्रौर्याच्या कहाण्या आजही काळीज फाडून टाकतात. हिटलरच्या छळछावण्यांमध्ये आणि…