ECKHART TOLLE
-
AVANI EK NAVI – अवनी एक नवी
Product Highlightsएकदा का मनुष्याला आपल्या स्वत:मधल्या अस्तित्वाची जाणीव झाली. त्याचं अवधान जागृत झालं की, स्वत:च्या ठिकाणचा दिव्यांश आणि प्रत्येक जीवाच्या ठिकाणी…
Birth Date : 16/02/1948
श्री. एकहार्ट टोले हे मूळचे जर्मन; पण आता अमेरिकेत स्थायिक झालेले प्रज्ञावंत, आत्मदर्शी लेखक. THE POWER OF NOW या त्यांच्या पुस्तकानं त्यांना जगात सर्वत्र अध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळवून दिली. कुठल्यातरी अज्ञात प्रेरणेमुळे ते चांगलं करिअर करण्याची शक्यता सोडून चेतना जागरणाच्या साधनेत मग्न झाले. द्वेष, हिंसा, अत्याचार ही मानवतेला जडलेली, अहंकारातून निर्माण झालेली दुखणी आहेत हे त्यांच्या ध्यानी आलं. यावर उपाय म्हणजे पृथ्वीवर एका नव्या चेतनेचं जागरण नि प्रकटन असं ते सांगतात. पति-पत्नी, आई-वडील, मुलं, मित्र-सहकारी या सर्वांच्या नातेसंबंधांना ही जागृत चेतना टवटवीत, अर्थपूर्ण करते. उपनिषदं, बौद्ध वाङ्मय, चिनी अध्यात्म, जे. कृष्णमूर्ती आणि खिस्तसाधना या सर्वांचा मोकळेपणाने संदर्भ देत ते सृष्टिविकासाला अनुकूल अशी एक नवीन जीवनपद्धती सुचवीत आहेत. ती म्हणजे A NEW EARTH – हे पुस्तक. त्याचा मराठी अनुवाद – अवनी एक नवी या नावाने आपल्याला सादर करीत आहोत.