E.R. BRAITHWAITE
-
TO SIR, WITH LOVE – टू सर , विथ लव्ह
Product Highlightsमि. ब्रेथवेट, नवे शिक्षक. त्यांनी आपल्या वर्गातील मुलांना शरमेनं मान खाली घालायला लावली. त्यांच्याशी झटापट केली, प्रसंगी कुस्तीसुद्धा खेळली. हळूहळू…
Birth Date : 27/06/1920
जॉर्जटाऊन, गयाना येथे जन्मलेले कादंबरीकार, लेखक आणि शिक्षक असलेले इ.आर. ब्रेथवेट कृष्णवर्णीयांबद्दलचे वांशिकभेद आणि सामाजिक स्थिती यांवरील कथांसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. शैक्षणिक गुणवत्ता आणि क्षमता असतानाही दुसऱ्या महायुद्धानंतर अन्य वांशिक अल्पसंख्यांकांप्रमाणे इ.आर. ब्रेथवेट यांनाही त्यांच्या क्षेत्रातले काम मिळू शकले नाही. त्यांना लंडनमध्ये शालेय शिक्षकाची नोकरी पत्करावी लागली. टु सर विथ लव्ह हे पुस्तक या शिक्षकी पेशातून आलेले अनुभवांचे बोल आहेत. पुस्तके लिहिताना ते सामाजिक कार्याकडे वळाले. कृष्णवर्णीय मुलांचा सांभाळ करण्यासाठी ते काम करू लागले. त्यातूनच पेड सव्र्हंट या कादंबरीचा उदय झाला. टु सर विथ लव्ह या पुस्तकावर १९६७ मध्ये चित्रपट प्रदर्शित झाला. शैक्षणिक सल्लागार म्हणून त्यांचे काम चालू आहेच. आत्तापर्यंत त्यांची सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत.