DR. PAULINE BOSS
-
AMBIGUOUS LOSS – अँबिग्युअस लॉस
Product Highlightsजीवन जगत असताना दु:ख आणि हानी कुणाच्या वाट्याला येत नाही? प्रत्येकाला ते भोगावंच लागतं. या हानीचे आणि दु:खाचेही कितीतरी प्रकार…
डॉ. पॉलिन बॉस एक प्रशिक्षक आणि संशोधक आहेत. अनिश्चित दु:ख या विषयावर सखोल अभ्यास आणि संशोधन करून काही सिद्धांत किंवा तत्त्वे त्यांनी जगासमोर ठेवली, जी थिअरी ऑफ अँबिग्युअस लॉस या नावाने ओळखली जातात. या विषयाच्या संशोधनांतर्गत १९७३ पासून डॉ. बॉस यांनी अनेक सायकॉलॉजिस्ट्स आणि काऊन्सेलर्स यांच्याबरोबर केवळ कामच केले नाही तर त्यांना प्रशिक्षितही केले आहे. या संशोधनामध्ये त्यांना आलेल्या अनुभवांतून त्यांनी अनिश्चित दु:ख घेऊन जगणाऱ्या लोकांना त्यातून उभारी घेऊन आयुष्य पुढे चालू करणे व ते अर्थपूर्ण बनवणे, ही कौशल्ये शिकवण्याचे ठरवले. १९७५ मध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट अॅण्ड फॅमिली स्टडीज या विषयात त्यांना विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठाकडून डॉक्टरेट देण्यात आली. १९७५ ते १९८१ या कालावधीत त्यांनी याच विद्यापीठात काही काळ सह-प्राध्यापक म्हणून काम केले. १९८१ नंतर २००५ पर्यंत त्यांनी मिनेसोटा विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ फॅमिली सोशल सायन्स येथे काम सुरू केले. अनिश्चित दु:ख घेऊन जी माणसे जगत आहेत, त्यांच्यावर उपचार करणारे आणि त्यांचे नातेवाईक, यांनी त्या दु:खी माणसांना पूर्वस्थितीत कसे आणावे, याच्या काही पद्धती या पुस्तकात त्यांनी दिल्या आहेत, जे या पुस्तकाचे मुख्य सूत्र आहे. हे पुस्तक स्पॅनिश, जर्मन, मेनलँड चायनीज, तैवान चायनीज आणि जपानी भाषेत अनुवादित झाले आहे.