
DR. NANDKUMAR UKADGAONKAR
About Author
Birth Date : 16/06/1949
मराठवाडा विभागातले पहिले मेंदूविकारतज्ज्ञ असणाऱ्या डॉ नंदकुमार गोविंदराव उकडगावकर यांचा जन्म १६ जून, १९४९रोजी झाला. १९६५च्या शालान्त परीक्षेत बोर्डात सर्वप्रथम आलेल्या डॉ. उकडगावकर यांचे शालेय शिक्षण हैदराबाद, अहमदनगर व औरंगाबाद येथे झाले. त्यांनी एम. बी. बी. एस. (१९७१) व एम. डी. (१९७५) या पदव्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद व डी. एम. (मेंदूविकार) - ग्रँट मेडिकल कॉलेज, मुंबई येथून प्राप्त केल्या. सर्व शैक्षणिक कारकिर्दीत त्यांनी प्रथम श्रेणी कायम ठेवली. इंग्लंड येथील न्यू कॅसल अपॉन टाईन व न्यूयॉर्कच्या सेंट ल्यूकस् हॉस्पिटल येथे मेंदूविकारउपचारांचे विशेष प्रशिक्षण त्यांनी घेतले आहे. ते सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद व ग्रँट मेडिकल कॉलेज, मुंबई येथे प्राध्यापक म्हणून १७ वर्षं कार्यरत होते. एम. बी.बी. एस , एम. डी. चे परीक्षक व गाईड म्हणूनही त्यांनी काम केले. औरंगाबाद येथे १९९३पासून स्वतःचे मेंदूविकार उपचार रुग्णालय त्यांनी सुरू केले. दर वर्षी मेंदूविकार परिषदांमध्ये उपस्थित राहण्यासाठी विविध देशांना भेटीही देत असतात. १९८७ ला स्थापन केलेल्या फिजिशियन्स असोसिएशन, औरंगाबादचे ते संस्थापक असून, सरस्वती भुवन माजी विद्यार्थी संघटनेचे माजी सरचिटणीस आहेत. डॉ. उकडगावकर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची क्रिकेट पंच परीक्षा उत्तीर्ण असून, महाविद्यालयीन काळात आंतरविश्व विद्यालयीन क्रिकेटस्पर्धांमध्ये सहभागी होत असत. बहुरंगी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या डॉ. उकडगावकर यांनी मराठवाडा विद्यापीठाची रशियन भाषेची तीन वर्षांची पदवी परीक्षाही उत्तीर्ण केली आहे. ‘हेलमेट्स’ च्या वार्षिक आनंदोत्सवाचं गेल्या २६ वर्षांपासून यशस्वी संयोजन करत असून, औरंगाबाद येथील १०४ वर्षे कार्यरत असलेल्या ३०,००० विद्यार्थी असणाऱ्या श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे सध्या सरचिटणीस आहेत.
-
HELL MATES – हेल मेट्स
Product Highlightsसत्य आठवणी व काल्पनिक प्रसंग यांना विनोदाचा मसाला लावून द्वैअर्थी शब्दांची फोडणी देऊन डॉ. नंदकमुार उकडगावकर यांनी लिहिलेल्या अठरा लेखांचं…