DR.M.B.KULKARNI
-
SHABDACHARCHA – शब्दचर्चा
Product Highlights‘अठरा विश्वे दारिद्र्य’ असे सर्रास बोलले, लिहिले जाते. कोणती अठरा विश्वे? नावे सांगता येतील? नाहीतच, तर कोठून सांगणार? मग हा…
Birth Date : 10/09/1930
Death Date : 29/01/2014
प्रा. डॉ. म.बा. कुलकर्णी यांचे शिक्षण एम.ए.(संस्कृत), एम.ए.(मराठी), पीएच. डी (संस्कृत), बी.एड. असे झालेले आहे. त्यांनी काही वर्षे पत्रकार, माध्यमिक शिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर दहा वर्षे रत्नागिरीच्या गोगटे कॉलेजात व एकवीस वर्षे नाशिक गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजांमध्ये पदवी व पदव्युत्तर विभागांतून ते मराठी व संस्कृत या विषयांचे अध्यापन करीत. त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात पीएच डी(संस्कृत) साठी मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. प्रारंभी सा. विवेकमधून व नंतर नाशिक येथील अमृत मासिक, तसेच दै. गावकरी, दै. लोकमत इत्यादी नियतकालिकांमधून त्यांनी विविध विषयांवर लेखन केले आहे. डॉ. कुलकर्णी यांची उपनिषदांतील कथा, पराक्रमी युवक : अनंत कान्हेरे, नव्याने रामकथा गाऊ, मनू आणि स्त्री, व्यावहारिक शहाणपणासाठी ३०१ सुभाषिते, सोन्याचा पाऊस (बालकथा) ही पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांनी मुक्त विद्यापीठासाठी काही पुस्तकांचे लेखन व संपादनही केले आहे. त्यांनी अनेक ठिकाणी रामायण व महाभारत या विषयांवर व्याख्याने दिली आहेत.