DR. L. C. GUPTA
-
MIRACULOUS EFFECTS OF ACCUPRESSURE – मिरॅक्युलस इफेक्ट्स ऑफ ॲक्युप्रेशर
Product Highlightsविविध रोगांशी लढा देण्यासाठी आपल्या शरीरात पुरेशी आंतरिक शक्ती असते. या शक्तीस ओळखा, विविध व्याधींवर मात करण्यासाठी या शक्तीचा योग्य…
साधारणत: पंधरा वर्षांपूर्वी एका अॅलोपॅथिक डॉक्टरने डॉ. ए. के. सक्सेना यांना अॅक्युपे्रशर या तंत्राची माहिती दिली. चंदीगड येथील डॉ. अत्तार सिंग यांनी डॉ. सक्सेना यांना अॅक्युप्रेशरची कला व तंत्र शिकविले. त्यानंतर अॅक्युप्रेशरच्या तंत्राचा वापर करून डॉ. सक्सेना यांनी आपले कुटुंबीय व मित्रांवर उपचार करण्यास सुरुवात केली. या उपचाराचे उत्तम परिणाम दिसून आल्यावर त्यांना प्रोत्साहन मिळाले आणि या अपारंपरिक उपचार पद्धतीचा प्रचार करण्यास डॉ. सक्सेना यांनी सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी इलेक्ट्रॉनिक व प्रिंट प्रसारमाध्यमांचाही उपयोग करून घेतला. या उपचारपद्धतीबाबत सामान्य जनात जनजागृती करण्यासाठी तसेच लोकांना आपल्या आंतरिक शक्तीची जाणीव करून देण्यासाठी ‘रोटरी क्लब ऑफ इंडिया’ने डॉ. सक्सेना यांना मदतीचा हात दिला. डॉ. सक्सेना यांनी २५००पेक्षाही अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत. हे रुग्ण विविध प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त झाले होते. त्यांचे रुग्ण हे जवळजवळ सर्व क्षेत्रांशी निगडित होते. अगदी सामान्य माणसे, नोकरशहा, न्यायाधीश, पोलिसदलातील विविध अधिकारी, लष्करी अधिकारी इत्यादी सर्व क्षेत्रातील लोकांनी डॉक्टर सक्सेनांकडून उपचार घेतले आहेत. डॉ. सक्सेना यांनी अनेक लोकांना अॅक्युप्रेशरचे तंत्र शिकविले आहे. या उपचारपद्धतीस फार मोठे यश मिळाले आहे. या तंत्रास लवकरच उपचारपद्धती म्हणून मान्यता मिळेल. डॉ. सक्सेना यांनी अनेक वरिष्ठ अॅलोपॅथिक डॉक्टरांवर या तंत्राचा वापर करून यशस्वी उपचार केले आहे. याचा परिणाम म्हणून हे डॉक्टर्सदेखील अॅक्युप्रेशर या तंत्राचा वापर औषधांच्या जोडीने करण्याबाबत सल्ला देत आहेत. डॉ. एल. सी. गुप्ता – M.D.D.SC (HON) (एम.डी.डी.एससी.(ऑनर्स) • ९६ वैद्यकीय पुस्तके लिहिण्याचा विश्वविक्रम • २००२ साली मिलेनियम मेडिकल ऑथर ऑफ सार्वÂ कन्ट्रीज (SAARC) हा पुरस्कार. • १९८८ साली बी.सी.रॉय नॅशनल अॅवॉर्ड हा पुरस्कार • १९९३ साली उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पुरस्कार पदक (PRESIDENTS POLICE MEDAL) मिळाले.