Birth Date : 04/03/1958
दिप्ती धनंजय जोशी यांनी इंग्रजी विषयात बी. ए. ही पदवी संपादन केली आहे. मुंबईतील एव्हरी इंडिया लि. या वंÂपनीत विक्री विभागात त्या कार्यरत होत्या. त्यांच्या अनोखे दान या कथेला रेल्वे कल्चरल अॅकॅडमीच्या वेग मासिकाचा पुरस्कार, शिक्षा कथेला चारचौघी मासिकाच्या कथा स्पर्धेचा प्रथम पुरस्कार, श्यामची आज्जी कथेला मीमराठी.नेट हे संकेतस्थळ आणि मेहता पब्लिशिंग हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या लेखन स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांची नजर ही कथा गृहलक्ष्मी मासिकाच्या कथास्पर्धेत ६०० कथांमधून अंतिम फेरीत दाखल झाली. तर डाग ही कथा जळगाव आकाशवाणीच्या युवावाणी कार्यक्रमात सादर केली गेली.