Birth Date : 14/01/1953
डेव्हिड कर्कपॅट्रिक यांचा जन्म १४ जानेवारी १९५३ रोजी झाला. ते तंत्रज्ञानविषयक बातम्यांचे संकलन करणारे पत्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. ते तंत्रज्ञानविषयक सभांचे नियोजनही करतात. १९८३ मध्ये फॉच्र्युन मॅगझिनमध्ये पत्रकार म्हणून ते रुजू झाले. १९८९ मध्ये त्यांनी लिखाणाला सुरुवात केली. जॅक डोरसे आणि सीन पार्कर यांच्यावर त्यांनी चरित्रात्मक लेख लिहिलेले आहेत. फोर्ब्ज मॅगझिनमध्येही त्यांनी तंत्रज्ञान व समाज या विषयांवर लेख लिहिले आहेत. जगामध्ये तंत्रज्ञानविषयक बातम्यांचे संकलन करणारे पत्रकार म्हणून त्यांचा कायमच वरचा क्रमांक राहिला आहे. त्यांचे बहुतेक लिखाण हे तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडित आहे.