DANNY DREYER ,KATHERINE DREYER
-
CHI RUNNING – ‘ची’ रनिंग
Product Highlightsडॅनी ड्रेयर यांनी ‘ताय ची’ या चिनी कौशल्यावर आधारलेले ‘ची रनिंग’ हे तंत्र विकसित केले आणि त्याचा वापर करून धावपटूंना…
डॅनी ड्रेयर हे धावणे आणि चालणे या क्रीडाप्रकारांतील नावाजलेले प्रशिक्षक आणि मार्गदर्शक आहेत. ते ‘अल्ट्रा मॅरेथॉन’ स्पर्धांमधील गाजलेले खेळाडू आहेत. एकूण ३९ अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धांमध्ये आपल्या विभागात पहिल्या तीन क्रमांकांत येण्याचा मान त्यांनी पटकावला आहे. ते आंतरराष्ट्रीय वक्ते आहेत. ‘सीएनएन’, ‘एनबीसी न्यूज’ आणि ‘डिस्कव्हरी चॅनेल’वरील अनेक कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असतो. ‘रनर्स वर्ल्ड’ आणि ‘रिंनग टाइम्स’मधून त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत. डॅनी आणि कॅथरिन ड्रेयर यांचे याआधी ‘ची वॉकिंग : फिटनेस वॉकिंग फॉर लाइफलाँग हेल्थ अँड एनर्जी’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. दर महिन्याला ते स्वत:चे बातमीपत्रही प्रसिद्ध करतात. ‘आरोग्य, वैयक्तिक वाढ आणि निरोगी राहणे’ या विषयीच्या क्षेत्रात गेली २५ वर्षे कॅथरिन कार्यरत आहेत. ‘ची लिव्हींग इन्कॉर्पोरेशन’च्या त्या सहसंस्थापिका आहेत. सध्या ते दोघे अॅश्व्हिलेले, नॉर्थ कॅरोलिना येथे राहत आहेत.