D.M.MIRASDAR
Birth Date : 14/04/1927
प्रा.द.मा. मिरासदार यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील अकलूज गावी १४ एप्रिल, १९२७ रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पंढरपूर येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील स.प. महाविद्यालयात झाले. त्यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात ‘दै. भारत’मध्ये पत्रकार म्हणून केली. काही काळ ते ना.सी. फडके संपादित साप्ताहिक ‘झंकार’मध्ये लेखन करत होते. १९५२नंतर मात्र त्यांनी शिक्षक म्हणून पंढरपूर व पुणे येथे काम केले. औरंगाबादमध्ये देवगिरी महाविद्यालयात व पुढे पुण्यातील गरवारे महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत राहून ते निवृत्त झाले. मराठी साहित्यात कथालेखक म्हणून त्यांचे योगदान मोठे आहे. ग्रामीण जीवनावर त्यांनी लिहिलेल्या कथा विशेष गाजल्या. मराठी साहित्यात विनोदी साहित्याची परंपरा मोठी आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, चिं.वि. जोशी, पु.ल. देशपांडे यांनी निर्माण केलेली विनोदी साहित्याची समृद्ध परंपरा मिरासदारांनी पुढे चालवली; एवढेच नव्हे, तर ग्रामीण वातावरण आणि विनोदी कथा या दोन धारांना एकत्र आणून एक स्वतंत्र वाट तयार केली. मराठी साहित्याला त्यांनी दिलेली ही मोठी देणगी मानली जाते. एकूण २०पेक्षा जास्त कथासंग्रह, रूपांतरित कादंबऱ्या तसेच ‘मी लाडाची मैना तुमची’ हे वगनाट्य आदि लेखन केले. चित्रपटलेखनाच्या क्षेत्रातही त्यांनी मोठी कामगिरी केली असून ‘एक डाव भुताचा’, ‘ईर्षा’, ‘ठकास महाठक’, ‘गोष्ट धमाल नाम्याची’ आदि अनेक चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. उत्कृष्ट पटकथा संवाद लेखनासाठी त्यांना अनेक महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त झाले असून लेखक म्हणून त्यांचा ‘गदिमा पुरस्कार’, ‘अत्रे पुरस्कार’, ‘काकासाहेब गाडगीळ पुरस्कार’ तसेच ‘दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच २०१४ सालचा महाराष्ट्र शासनाचा विं.दा. करंदीकर जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. १९९८ साली परळी वैजनाथ येथे भरलेल्या ७१व्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील व द.मा. मिरासदार यांनी महाराष्ट्रात, देशात तसेच परदेशात कथाकथनांचे हजारो कार्यक्रम करून मराठी कथेला लोकप्रिय केले. लेखनाबरोबरच त्यांनी सामाजिक कार्यही केले. अ.भा. विद्यार्थी परिषदेचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. आणीबाणीच्या काळात त्यांनी केलेली भाषणे गाजली. संस्कार भारतीचे उपाध्यक्ष तसेच मराठी साहित्य परिषद, पुणेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.
-
ANGAT PANGAT – अंगत पंगत
Product Highlights‘अंगतपंगत’ हे द. मा. मिरासदार यांचं विनोदी ललित लेखांचं पुस्तक आहे. वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेले हे लेख हसवतात आणि अंतर्मुखही करतात.… -
BENDBAJA – बेंडबाजा
Product Highlightsअडाणीपणा, बेरकीपणा, मूर्खपणा, भोळसरपणा इ. माणसांचे "सदगुण` म्हणजे विनोदी लेखनासाठीचा कच्चा मालच. ग्रामीण आणि नागर दोन्ही भागात हा कच्चा माल… -
BHOKARWADICHYA GOSHTI – भोकरवाडीच्या गोष्टी
Product Highlights"विहिरीत रॉकेल सापडल्यावर ‘बॉम्बे हाय’सारखी ‘भोकरवाडी हाय’ वंÂपनी स्थापन करून निवांत जगण्याचं स्वप्नं पाहणारा शिवा जमदाडे अन् त्याची कट्टा कंपनी...… -
BHOKARWADITIL RASVANTIGRUHA – भोकरवाडीतील रसवंतीगृह
Product Highlightsदुकानदारीची सदोबांची काय कल्पना होती, कोण जाणे! गिऱ्हाईक वाढवण्यासाठी नित्य काही नवे करावे लागते, निरनिराळ्या योजना आखाव्या लागतात, दुकानाची आकर्षक… -
BHUTACHA JANMA – भुताचा जन्म
Product Highlights...ही भुते कुठेही असू शकतात. ती अमक्या ठिकाणी नाहीत, असे कुणालाही छातीवर हात ठेवून सांगता यायचे नाही. साधारणपणे सांगायचे म्हणजे… -
CHAKATYA – चकाट्या
Product Highlightsशिवाजीमहाराजांच्या हस्ताक्षराने मास्तर व बाबांकडून खिंडीत सापडलेला मोरेश्वर... जगबुडीचा प्रलय आला; पण तो गावापर्यत पोहचलाच नाही... भुतालाही न घाबरणारे बाबा… -
CHUTKYACHYA GOSHTI – चुटक्याच्या गोष्टी
Product Highlightsगावात आलेल्या भोंदू "महाराजा`ची साक्ष शिवा जमदाडेबाबत खरी ठरते, तेव्हा... घरात शिरलेल्या चोरांना एक " धोरण` ठरवून रामभाऊ किल्ल्या देतात,… -
GAMMATGOSHTI – गमंत गोष्टी
Product Highlightsखासबातमीचं भांडवल करणाया किसन न्हाव्याची तहा... पंचनाम्यात दुरुस्ती कशी करायची याचे प्रात्यक्षिक घेणारा नारायण कॉन्स्टेबल... दिल्लीला प्रदर्शन पाहण्यास निघालेल्या पाटलांनी… -
GANARA MULUKH – गाणारा मुलुख
Product Highlightsठणठणपूरच्या चक्रमादित्य महाराजांकडे एक गानसेन नावाचा गवई येतो. त्याच्या अदाकारीवर महाराज फिदा होतात. गवयाची इच्छा पूर्ण करायची म्हणून एक अचाट… -
GAPPAGOSHTI – गप्पागोष्टी
Product Highlights`माझा कै. वृत्तपत्रव्यवसाय` मधला नायक आपल्या बौद्धिक बाणेदारपणामुळे आपली पत्रकारिता कशी कैलासवासी` झाली हे स्वत:च सांगतो... शहरात राहणाऱ्यांना खेडेगावाबद्दल किती… -
GAPPANGAN – गप्पांगण
Product Highlightsगुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार वरचा माणूस खाली येतो; पण खालचा मनुष्य एकदम वर जातो, तो फक्त – सिनेमातच! गागाभट्टांनाही अवकाशात पाठवण्याचे सामथ्र्य… -
GOSHTICH GOSHTI – गोष्टीच गोष्टी
Product Highlightsजादू-बिदू काही नसते; सगळी बनवाबनवी असते, हे दाखविण्यासाठी बाबू बनला भोकरवाडीतील ‘जादूगार’! हॉटेलमध्ये चोरी झाल्याची ‘कम्प्लेंट’ बजाबाने दिली, मात्र चोरी…