CHARLES HANDY
-
SWARTHATUN PARARTHAKADE – स्वार्थातून परमार्थाकडे
Product Highlightsएकीकडे जगातील एकतृतीयांश कामगार बेकार आहेत, तर त्याचवेळी दुसरीकडे जगाच्या एकूण व्यापाराच्या दोनतृतीयांश व्यापार फक्त ५०० कंपन्यांच्या हातांत आहे आणि…
लेखक आणि तत्वज्ञ असलेल्या चार्ल्स हॅन्डी यांचा जन्म १९३२ मध्ये किल्डरे, आयर्लंड येथे झाला. त्यांनी त्यांचे संपूर्ण शिक्षण लंडन आणि अमेरिकेतून पूर्ण केले. ओरियल कॉलेज, ऑक्सफर्ड येथून प्रथम श्रेणीत पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी ‘शेल इंटरनॅशनल’साठी विपणन क्षेत्रात काम सुरू केले. ‘संस्थेचे कार्ये आणि व्यवस्थापन’ या विषयात विशेष प्रावीण्य प्राप्त केलेल्या हॅन्डी यांनी १९७२ मध्ये ‘लंडन बिझनेस स्कूल’मध्ये ‘व्यवस्थापन मानसशास्त्र’ शिकण्यास सुरुवात केली. १९७७ ते १९८१ दरम्यान त्यांनी विंडसर कॅस्टल येथील ‘स्टडी सेंटर’मध्ये ‘सामाजिक नैतिकता आणि मूल्ये’ यासंबंधी काम केले. १९८७ ते १९८९ या काळात त्यांनी लंडनच्या ‘रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्स’चे अध्यक्षपद भूषवले. आत्तापर्यंत त्यांनी जवळ-जवळ सात ब्रिटीश विद्यापीठांकडून ‘डॉक्टरेट’ पदवी संपादन केली आहे. व्यवस्थानप क्षेत्रातील सर्वांत प्रभावशाली अशा ५०विचारवंतांमध्ये त्यांची गणना केली जाते. तर २००१ मध्ये ते या यादीत दुसऱ्या स्थानावर होते. सध्या ते नभोवाणी तसेच दूरचित्रवाणीवरचे नामांकित वक्ते म्हणून ओळखले जातात. जगभर त्यांच्या पुस्तकांच्या दहा लाखांहून अधिक प्रती खपल्या आहेत. सध्या हॅन्डी हे आपली पत्नी एलिझाबेथ व दोन मुलांसह इंग्लंड आणि इटली येथे वास्तव्य करत आहेत.