BABARAO MUSALE
Birth Date : 10/06/1949
बाबाराव गंगाराम मुसळे हे मराठीतील प्रथितयश कवी आणि लेखक आहेत. १९८५मध्ये हाल्या हाल्या दुधू दे या कादंबरीने प्रसिद्धीच्या झोतात आले. या कादंबरीने ग्रामीण वास्तव आपल्या खास शैलीत टिपणारे कादंबरीकार म्हणून त्यांना मान्यता मिळवून दिली. त्यांच्या हाल्या हाल्या दुधू दे नंतर आलेल्या पखाल कादंबरीलाही रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पु.ल. देशपांडे यांनी पखालचे विशेष कौतुक केले होते. दरम्यानच्या काळात बाबाराव मुसळे यांची झुंगु लुखू लुखू, मोहोरलेला चंद, नगरभोजन हे कथासंग्रह आणि पाटीलकी, दंश, स्मशानभोग या कादंबऱ्या प्रकाशित होत राहिल्या तर वारूळ या कादंबरीने पुन्हा एकदा मराठी साहित्यात खळबळ निर्माण केली. वाचक त्यांच्या लेखनशैलीला सरावलेला असतानाच इथे पेटली माणूस गात्रे या कवितासंग्रहाला सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील हा साहित्य पुरस्कार मिळाला आणि बाबाराव मुसळे हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले. कादंबरी आणि कथालेखन करत असतानाच मुसळे यांचे कवितालेखनही समांतरपणे सुरू होते. त्यांची कविता नागर, ग्रामीण, दलित, आदिवासी असा विविध प्रवाहांना आपल्यात सामावून घेत आपल्या पद्धतीने व्यक्त होते. बाबाराव मुसळे यांना डाॅ.गिरीश गांधी फाऊंडेशन नागपूर तर्फे स्व.मिरादेवी पिंचा स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
-
NO NOT NEVER – नो नॉट नेव्हर
Product Highlightsही कहाणी आहे वNहाड विदर्भातल्या दोन मुलींची. गुणी, सोज्वळ आणि गरीब राणीची आणि श्रीमंत कुटुंबातल्या हटखोर मंकीची. राणीच्या घरची परिस्थिती… -
VARUL – वारूळ
Product Highlights‘वारूळ’ ही बाबाराव मुसळे यांची कादंबरी ग्रामीण भागातील मागासवर्गीयांच्या समाजजीवनाचं यथार्थ दर्शन घडवते. दोन भागांत असलेल्या या कादंबरीमध्ये मागास जातींतील…