AVINASH HAMBIRRAO LONDHE
-
BEDHUND – बेधुंद
Product Highlights‘बेधुंद’ ही जयंत, अक्षय, सुरेश, समीर आणि अण्णा (फाइव्ह स्टार्स) या पाच मित्रांची कहाणी आहे. एकाच कॉलेजमध्ये शिकणारे हे पाच…
Birth Date : 17/02/1985
अविनाश लोंढे यांनी खरगपूर येथील आयआयटीमधून एम.टेक. ही पदवी घेतली. सध्या ते इथिओपियामधील कोका-कोला कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर आहेत. ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील वेणेगावचे आहेत. त्यांना वाचन, लिखाण व संगीताचा छंद आहे. त्यांच्या बेधुंद या चारोळीसंग्रहाचे समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते २०११ मध्ये प्रकाशन झाले. २००५-०६ मध्ये झालेल्या यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय विद्यालयीन कथा स्पर्धेत अविनाश लोंढे यांना चौथा क्रमांक मिळाला. ते आयआयटी खरगपूरमध्ये महाराष्ट्र मंडळा चे सांस्कृतिक सचिव होते. तसेच ते २००५-०६ मध्ये डॉ. अण्णासाहेब शिंदे अभियांत्रिकी विद्यालयात अंतरंग कमिटीचे संपादक आणि वादविवाद, वक्तृत्व अन् सांस्कृतिक कमिटीचे सलग दोन वर्षे सदस्य होते.