ASHISH BORKAR
-
STHULATELA KARA TATA – स्थूलतेला करा टाटा
Product Highlightsडॉ. आशिष बोरकर व डॉ. गौरी बोरकर यांचे `स्थूलते`वरील संशोधन पुस्तकरूपाने येत आहे. आपली प्रकृती आणि व्यवसाय यांना अनुरूप आहार,…
Birth Date : 25/02/1976
अहमदनगर व पुणे येथील स्वत:च्या खाजगी प्रॅक्टीसबरोबरच आयुर्वेदाचा प्रचार व्हावा यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. रावणीय नाडीविज्ञान आणि आयुर्वेदीय पंचकर्म यांमध्ये विशेष प्राविण्य मिळवून संशोधनही केले. ‘स्थूलता’ या विषयावर आयुर्वेदशास्त्राच्या आधारे संशोधन करून नवीन उपचारपद्धती त्यांनी विकसीत केली. हृदयरोग, मधुमेह, मनोविकार यावर विशेष उपचारपद्धती. स्त्री-पुरुष वंध्यत्व, लैंगिक व मनोलैंगिक समस्या यावर विशेष संशोधन. लहान बालकांपासून ते पौंगडावस्थेतील मुलांच्या शरीर व मनाच्या संतुलनासाठी योगशास्त्र व आयुर्वेदशास्त्राच्या आधारे विशेष उपचारपद्धती विकसित केली. साई सोशल अँड मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून ‘स्थूलताविषयक’, ‘गर्भसंस्कार’, ‘आयुर्वेदिय ब्युटीथेरपी’ या विषयांवर व्याख्याने व शिबीरे आयोजित केली. अनेक वर्तमानपत्रे, नियतकालिके, दिवाळी अंक यांत आयुर्वेदविषयक विपुल लेखन.