ASHA BAGE
Birth Date : 28/07/1939
आशा अरविंद बगे या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखिका. यांचा जन्म नागपूर येथे झाला. आजपर्यंत त्यांच्या ५ कादंबऱ्या व ९ कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. काही कथांचे भारतातील इतर भाषांतून अनुवाद प्रकाशित झाले आहेत. इंग्रजी, फ्रेंच, जर्मन व उर्दू या भाषांतूनही अनुवाद प्रसिध्द आहेत. विख्यात हिंदी साहित्यिक श्री. कमलेश्वर यांनी मराठीतून निवडलेल्या पहिल्या पाच कथांमध्ये यांच्या कथेचा समावेश आहे. दिल्लीला कथा या आंतरभारतीय संस्थेतर्फे इंग्रजी अनुवादाकरिता तुफान (१९९२) आणि पंख (१९९४) या कथांचा निवड झाली आहे. पुरस्कार : मारवा, अत्तर, पुजा, मांडव या कथासंग्रहांना व झुंबर या कादंबरीस महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाले आहेत. त्याच बरोबर नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा डॉ. अ.बा. वर्टी पुरस्कार, कै. राधाबाई बोबडे स्मृती पुरस्कार, कै. दि. बा. मोकाशी पुरस्कार, कै. काकासाहेब गाडगीळ पुरस्कार, पत्र या कथेला शांताराम कथा पुरस्कार, धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र या कादंबरीला विदर्भ साहित्य संघ, नागपूर पुरस्कार, कथा शताब्दी वर्षात विदर्भ साहित्य संघाच्या लेखिका संमेलनाचे अध्यक्षपद, यंदाचा सु.ल. गद्रे मातोश्री पुरस्कार, दर्पण या कथासंग्रहास यंदाचा कै. केशवराव कोठावले पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. लेखनाव्यतिरिक्त त्यांना संगीताची आणि आई-वडील, आजोबांकडून वारसाने आलेली नाटकांचीही आवड आहे. पूर्वी अधून-मधून आकाशवाणी व रंगभूमीवर नाटकातून भूमिका केलेली आहे. महाराष्ट्र सेवा संघाचा सु.ल.गद्रे साहित्यिक पुरस्कार
-
NISATLELE – निसटलेले
Product Highlightsस्त्रीपुरुष संबंधांतील विविध नाती सुन्न करणारी असतात, आयुष्याला वळण देणारी असतात. नात्यांना समजावून घेणे आणि त्याप्रमाणे जगणे ही एक जीवघेणी… -
PAULVATEVARLAGAON – पाऊलवाटेवरले गाव
Product Highlightsएखादीच रिकामी होडी किनायाला. संथ पाण्यावरून पक्षी या तीरावरून त्या तीराकडे उडतात. दुपार कलते. थोडी थंड हवा सुटते. कदाचित पाऊस… -
PRATIDWANDWI – प्रतिद्वंद्वी
Product Highlightsत्याला अनूची तीव्र अशी आठवण आली. तो लवकरच पूर्ण बरा होत होता आणि आता तिची तशी गरज राहणार नव्हती. पण…