ANAND KANHERE
-
MASVI KANHERE – मॅस्वी कान्हेरे
Product Highlights१९६२च्या युद्धानंतर मॅस्वीने सेनादलांसाठी सामानसामुग्री उतरवण्या-चढवण्यासाठी मुद्दाम लोडर बनवला त्याप्रसंगी तेव्हा सुब्बुने मला मिठी मारली व रडू लागला. ते आनंदाश्रू…
Birth Date : 04/06/1941
वयाच्या पंचाहत्तरीत असलेले आनंद कान्हेरे यांनी बडोद्याच्या एम.एस. विद्यापीठातून बी.ई (इलेक्ट्रॉनिक व पुणे विद्यापीठातून व्यवस्थापन क्षेत्रातील एम.एम.एस. या पदव्या घेतल्या आहेत. ते क्रिकेट व बॅडमिंटनही उत्तम खेळायचे. त्यांनी सातत्याने आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांत भाग घेतला आणि विजेतेपद मिळवले होते. त्याशिवाय त्यांनी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा (आय एल ओ चा) लीडर्स ऑफ टुमॉरो हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम केलेला आहे. त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या मॅस्वी कंपनीत त्यांनी १९६५ ते १९७३ ही आठ वर्षे अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली. दुर्दैवाने ती कंपनी बंद पडल्यानंतर सह्याद्री उद्योग, किर्लोस्कर किसान, महिन्द्रा ओवेन, आरसीए फोटोफोन, स्वस्तिक रबर इत्यादी औद्योगिक आस्थापनांतून जबाबदारीच्या तंत्र-व्यवस्थापकीय पदांवर कामे केली. १९८२ मध्ये त्यांनी स्वत:चा हर्षांजली उद्योग हा व्यवसाय सुरू केला आणि १९८९ मध्ये त्याचे हर्षांजली इन्स्ट्रुमेंन्टस या कंपनीत रूपांतर केले. अलीकडे त्यांनी आपले ज्येष्ठ चिरंजीव जय यांच्या बरोबर जी. आय. ऑटोमेशन अॅन्ड सिस्टीम्स प्रा. लि. ही रोबोटिक्सच्या क्षेत्रात कार्य करणारी कंपनी सुरू केली. या वयातही ते औद्योगिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची अजुनी रुसून आहे ही सामाजिक कादंबरी १९७३ मध्ये कुलकर्णी ग्रंथागार मार्फत प्रकाशित झाली आहे.