ALLAN PEASE, BARBARA PEASE
अॅलन आणि बार्बरा पीस यांनी लिहिलेल्या एकूण चौदा पुस्तकांपैकी आठ बेस्टसेलर ठरली आहेत. त्यांचे साहित्य पन्नास भाषांमध्ये प्रसिद्ध होऊन जवळजवळ शंभर देशांतील वाचकांपर्यंत पोहोचले आहे. त्यांच्या पुस्तकांच्या दोन कोटींहून अधिक प्रती आतापर्यंत विकल्या गेल्या आहेत. या दोघांनी लिहिलेले व्हाय मेन डोन्ट हॅव अ क्लू अॅण्ड विमेन ऑल्वेज नीड मोअर शूज हे पुस्तकही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अॅलन पीस हे जन्माने ऑस्ट्रेलियन असून व्यवसायानिमित्त तीस देशांमध्ये त्यांचे सतत भ्रमण चालू असते. यशस्वी होण्याचा मंत्र ते गेली तीस वर्षे जगाला शिकवीत आहेत. सहा बीबीसी सायन्सच्या कार्यक्रमांचा विषय ते करीत असलेले कार्य हा आहे. बार्बरा पीस या अनेक बेस्टसेलर पुस्तकांच्या लेखिका व सहलेखिका आहेत. त्या ऑस्ट्रेलियन तरुणांना बॉडी लँग्वेज व संभाषण कौशल्ये शिकवतात. त्या अत्यंत यशस्वी मॉडेल व विक्री क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहेत. आपल्या पुस्तकातील माहिती अचूक व परिपूर्ण असावी यासाठी हे दोघे भरपूर मेहनत घेतात. त्यासाठी ते देशोदेशीच्या एक्स्पर्ट्सना भेटतात, लोकांच्या मुलाखती घेतात, सेमिनार्स घडवून आणतात. म्हणूनच त्यांची पुस्तके वाचकांच्या पसंतीस उतरतात.
-
WHY MEN DON’T LISTEN AND WOMEN CAN’T READ MAPS – व्हाय मेन डोन्ट लिसन ॲण्ड विमेन कान्ट रीड मॅप्स
Product Highlightsस्त्री व पुरुष यांच्यातील नातेसंबंध बिघडतात ह्याचे कारण म्हणजे पुरुषांना हे समजत नाही की बायका त्यांच्यासारख्या का नाहीत; आणि बायकांना…