ADALJA VARSHA
-
ANSAR – अणसार
Product Highlightsप्रसिद्ध गुजराती लेखिका वर्षा अडालजा यांची ‘अणसार’ ही कादंबरी म्हणजे प्रत्येक संवेदनशील व्यक्तीला अंतर्मुख करणारी आणि जीवनमूल्यंच तपासून पाहण्यास उद्युक्त…
Birth Date : 10/04/1940
वर्षा महेंद्र अडालजा या गुजराती साहित्यिक आहेत. त्यांचा जन्म मुंबईमध्ये झाला. वडील लेखक. वयाच्या दहाव्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण. अभिजात नाटकांमध्ये मध्यवर्ती भूमिका. काही भूमिकांसाठी पुरस्कार. मुंबई विद्यापीठातून भाषा या विषयांत बी. ए. आणि समाजशास्त्र या विषयात एम. ए., ऑल इंडिया रेडिओवर उद्घोषक म्हणून काम. अन्सार या कादंबरीचं नाट्यरूपांतर, आकाशवाणीवरून क्रमश: वाचन. या कादंबरीच्या गुजरातीमध्ये अनेक आवृत्त्या प्रकाशित. राजस्थानी भाषेत अनुवाद. दिल्लीच्या साहित्य अकादमीकडून नुकताच इंग्रजी भाषेत अनुवाद. या कादंबरीसाठी दिल्लीचा साहित्य अकादमी पुरस्कार, गुजरात विद्या सभेचा पुरस्कार, कोलकत्त्याच्या भारतीय भाषा परिषदेचा पुरस्कार प्राप्त. अनेक कादंबऱ्यावर दूरदर्शन मालिकांची निर्मिती. त्यातील काहींना पुरस्कार प्राप्त. कादंबऱ्या, लघुकथा संकलनं, नाटकं, निबंध, प्रवासवर्णनं, संपादित पुस्तकं अशी जवळपास ५० पुस्तकं नावावर जमा. चाळीस वर्षांपासून गुजराती साहित्य परिषदेच्या निर्वाचित सदस्य. गुजराती साहित्य अकादमीच्या सल्लागार, गुजराती साहित्य परिषदेच्या उपाध्यक्ष इ. पदे भूषविली. अमेरिकेतील फ्लोरिडा येथे भरलेल्या साहित्यविषयक परिषदेत आणि लंडनच्या बुक फेअरमध्ये सहभाग. साहित्यातील योगदानासाठी जीवनगौरव पुरस्कार, साहित्य गौरव पुरस्कार, पत्रकारितेतील योगदानासाठी गुजरातच्या पत्रकार संघाचा पुरस्कार. लघुकथा संकलनासाठी, कादंबऱ्यासाठी गुजराती साहित्य अकादमी, महाराष्ट्र-गुजराती साहित्य अकादमी, गुजरात सरकार तर्फे विविध पुरस्कार. गुजरात गव्हर्नमेन्ट फिल्म बोर्डाचा पुरस्कार, के. एम. मुन्शी पुरस्कार, सोव्हिएत लॅन्ड नेहरू पुरस्कार इ. पुरस्कारांनी सन्मानित. नुकत्याच प्रकाशित क्रॉसरोड पुस्तकास दर्शक अॅवॉर्ड.