ABHIJIT KULKARNI
-
RED TAPE – रेड टेप
Product Highlightsसरकारी अधिकारी ही उपाधी भारदस्त वाटत असली तरी सत्ताधारी, विरोधक, प्रसार माध्यमे, पुढारी, सामाजिक कार्यकर्ते अशा अनेक घटकांसाठी खरे तर…
Birth Date : 19/01/1974
दोन दशकांहून अधिक काळापासून अभिजित कुलकर्णी हे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. नाशिक, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई हे कार्यक्षेत्र असलेल्या अभिजित यांना मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक अशा दोन्ही माध्यमांचा अनुभव आहे. २००६ ते २००८ या कालावधीत मंत्रालयात राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात सहायक संचालकपदावर काम करताना त्यांनी राजपत्रित अधिकारी या नात्याने प्रशासकीय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभवही घेतला आहे. त्यानंतर पुन्हा ते पत्रकारितेत सक्रिय असून, राजकारण आणि प्रशासन हे त्यांच्या आवडीचे व अभ्यासाचे विषय आहेत. या वाटचालीतील भल्याबुऱ्या अनुभवांच्या आधारावर प्रस्तुत कादंबरी बेतली आहे.